Back
बालापूर नगरपालिका चुनाव: कांग्रेस की जीत, आफरीन परवीन जमीर नगराध्यक्ष बनीं
JJJAYESH JAGAD
Dec 21, 2025 09:06:41
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेस ( सध्या वंचित बहुजन आघाडी ) पक्षाच्या खतीब कुटुंबीयांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्चस्व राहिले आहे. मध्यंतरीच्या काळात खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा बसत चार वर्षे सत्ता हातातून गेली होती. मात्र यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करत नगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे येथे सर्व आजी–माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुमारे ८० टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेल्या बाळापूरमध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरणार होती. मुस्लिम उमेदवारांची संख्या अधिक असल्याने मतविभाजन होऊन भाजपला फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र बाळापूरच्या मतदारांनी हे सर्व अंदाज फोल ठरवत काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. काँग्रेसच्या उमेदवार आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी १,९२७ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या लढतीत उबाठाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार व सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते नतिकोद्दीन खतीब तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार व सध्या भाजपचे नेते बळीराम शिरस्कार हे तिन्ही आजी–माजी आमदार आपल्या-आपल्या उमेदوارांसाठी मैदानात उतरले होते. मात्र तिन्ही पक्षांची जादू न चालता काँग्रेसने सर्वांना मागे टाकत दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे बाळापूरच्या राजकारणात काँग्रेसचे स्थान अधिक बळकट झाले असून आगामी काळात स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल ठरणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASARUN SINGH
FollowDec 21, 2025 11:04:470
Report
0
Report
JGJugal Gandhi
FollowDec 21, 2025 11:03:420
Report
JAJhulan Agrawal
FollowDec 21, 2025 11:03:270
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowDec 21, 2025 11:03:140
Report
SKSumit Kumar
FollowDec 21, 2025 11:02:580
Report
ADAjay Dubey
FollowDec 21, 2025 11:02:470
Report
0
Report
DNDinesh Nagar
FollowDec 21, 2025 11:02:350
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowDec 21, 2025 11:02:200
Report
KMKuldeep Malwar
FollowDec 21, 2025 11:01:430
Report
APAbhay Pathak
FollowDec 21, 2025 11:01:110
Report
PGPARAS GOYAL
FollowDec 21, 2025 11:00:550
Report
DTDinesh Tiwari
FollowDec 21, 2025 11:00:290
Report
0
Report