Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410503
मंचर में बाबू गेणू की पुण्यतिथि पर ज्योत सोहळे में उत्साह, गाँव ने स्वागत किया
HCHEMANT CHAPUDE
Dec 12, 2025 06:30:35
Manchar, Maharashtra
मंचर/पुणे हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांच्या बलिदानभूमी कळबादेवी, मुंबई ते जन्मगाव महाळुंगे पडवळ दरम्यान आयोजित ज्योत सोहळे मंचर मध्ये उत्साहात स्वागत झाले. मंचर ग्रामस्थांनी शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी ज्योत सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर वाजत गाजत ही ज्योत महाळुंगे पडवळ गावाकडे रवाना झाली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Dec 12, 2025 01:45:19
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 10, 2025 03:15:16
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या न जाता पिंजऱ्यातील भक्ष ठेवलेल्या कोंबडीला पंजा मारून ठार केलंय मात्र वन विभागाने लावलेल्या या पिंजऱ्या भोवती बिबट्या कसे घिरट्या घालतात याचा एक व्हिडिओ त्या ठिकाणावरून प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रीत केल्याची एक्सक्लिजीव दृश्य आपण झी २४ तासवर पाहू शकता. एक मादी आणि तिचे दोन बछडे असे तीन बिबटे एक साथ भक्षासाठी कोंबडीला पकडण्याचा प्रयत्न करताय हे आपण पाहू शकता.. त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान आता वनविभागापुढे असणार आहे, पिंजरे लावून ही जर बिबटे पिंजय्रात जातच नसतील तर हे बिबटे जेरबंद कधी होणार आणि नागरिकांची बिबट्यांच्या दहशतीतून सुटका कधी होणार हेच या व्हिडिओमधून आपल्याला समोर आल्याच पहायला मिळतंय...
184
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 08, 2025 07:04:55
Pune, Maharashtra:मावळातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे भेट घेतली असून धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा जरांगे पाटील यांच्या समोर मांडली असून गेली पंचवीस वर्षे धरणग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पुसाने आणि दिवड गावातील शेतकरी न्याय मिळावा यासाठी आपली व्यथा ठामपणे मनोज जरांगे पाटील यांच्या समोर मांडली. मावळ तालुक्यातील पुसाणे आणि दिवड गावातील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमीन 1996-97 मध्ये लघु पाटबंधारे खात्यांतर्गत संपादित झाली, मात्र पंचवीस वर्षे झाली या शेतकऱ्यांना पीक पाण्याचा लाभ नाही, मोबदल्याची पूर्ण भरपाई नाही, आणि शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यालाही अद्याप न्याय मिळालेला नाही. अशी संतप्त भूमिका येथील शेतकऱ्यांनी मांडली. या सर्व परिस्थितीवर उपाययोजना व्हाव्यात, तसेच आमच्या मागण्यांना न्याय मिळावा या अपेक्षा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे व्यक्त केली. प्रमुख मागण्या: -शासन निर्णय 2013-14 नुसार आजच्या चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदल्याची मागणी. -1996-97 पासून आजपर्यंतच्या पीक नुकसानीची नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी. -धरणग्रस्तांच्या घरांपासून इझराडे, तळी, विहिरी व इतर ज्या ज्या मालमत्ता संपादित झाल्या त्यांची योग्य भरपाई मिळावी. -धरणग्रस्तांच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने संधी द्यावी.
266
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 02, 2025 07:00:18
187
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 02, 2025 06:15:21
235
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 02, 2025 04:45:33
Baramati, Maharashtra:इंदापूरची जनता विकासाला साथ देईल : भरत शहा यांनी व्यक्त केला विश्वास.... इंदापूरचा विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार : भरत शहा..... पुण्याच्या इंदापूर मध्ये शहा विरुद्ध गारटकर चुरशीची लढत.... पुण्याच्या इंदापूरमध्ये भरत शहा विरुद्ध प्रतिप गारटकर ही अत्यंत चुरशीची लढत पार पडत आहे. इंदापूरची जनता सुज्ञ असून ती विकासाला मत देईल, आम्ही इंदापूरच्या विकासाचे व्हिजन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंसोबत आहोत, विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही लढत आहोत त्यामुळे विजयाचा गुलाल आमचाच असेल असा दावा भरत शहा यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना केलाय.... त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी...
185
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 29, 2025 11:19:36
Rajgurunagar, Maharashtra:राजगुरुनगर नगरपरिषदेचे निवडणूक चौरंगी होत असून सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरण आहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय या ठिकाणी आमचा उमेदवार कामाच्या बाबतीत उजवा असून पक्षाचे जनमत हि चांगले असून जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास किरण आहेर आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय तर पैसे वाटपाच्या गैरसमजवरून झालेली मारहाण चुकिची असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर आजच अशी मारहाण करत असेल तर उद्या काय करणार असं म्हणत हि दंडूकशाही चांगली नाही असं मोहिते पाटलांनी म्हणत भाजप उमेदवारावरती ही निशाणा साधलाय यावेळी त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
97
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 16:15:32
Baramati, Maharashtra:हजरत चांदशाहवली बाबांच्या उरूसाला आजपासून सुरुवात झालीय... यंदाच्या उरूसाचे ४६१ वे वर्ष आहे. तीन दिवसाच्या उरूसाच्या काळात हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावून बाबांच्या मजारीचे दर्शन घेतात. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून हे सर्व दूर परिचित आहे. उरुसाच्या पहिल्या दिवशी संदल आणि गल्लफ व फूलांची चादर अपर्ण केल्यानंतर संदलच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम युवक सहभागी होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले हे सरदार होते. त्यांच्या पश्चात त्यांचा इंदापूर परगना असलेला गल्लफचा मान हा पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. शनिवारी उरूसाचा मुख्य दिवस आहे. रविवारी झेंडा व जियारत होऊन शोभेच्या दारुकामाने व फटाक्याच्या आतिशबाजीने बाबांच्या झेंड्याची ग्राम प्रदिक्षणा होऊन सांगता होणार आहे. उरुसानिमित्त दर्गाहला आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
148
comment0
Report
Advertisement
Back to top