Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

पेण-खोपोली मार्ग पर धावती कार में आग, तीनों यात्री सुरक्षित

PPPRAFULLA PAWAR
Dec 16, 2025 16:03:24
Chendhare, Alibag, Maharashtra
पेण खोपोली मार्गावर धावत्या कारला आग लागली. कारमधील तीनही प्रवासी सुखरूप आहेत. पेण खोपोली रोडवर पेण नजीक धावत्या कारने संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. पेण नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आग विझवली. ही कार पुण्याहून दापोलीकडे जात असताना ही घटना घडली. कारमधील तीनही प्रवासी सुखरूप आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Dec 18, 2025 05:47:52
Beed, Maharashtra:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अगदी सिनेस्टायिल पद्धतीने अटक केली आहे. बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात ड्रोनच्या माध्यमातून गुन्हेगारी वस्तीवर छापा टाकला. ड्रोन कॅमेरा द्वारे रेकी करून शंभर पोलिसांनी गावाला चारही बाजूने घेेरा टाकत चोरट्यांना अटक केलीये. धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे चोरटे आश्रय घेत होते. त्यामुळे येथे जाण्यास पोलीस देखील धजावत असे. मात्र बीड आणि धाराशिव पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने टोळी सदस्यांना अटक केली. मागील काही दिवसात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त্রाचा धाक दाखवत लूटमार केली जात होती. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये दहशत होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 05:33:25
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 05:19:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारी जाचातून किडनी विकल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला. पीडित शेतकरी रोशन कुडे याची डावी किडनी काढण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालात उघड झाले. काल रात्री उशिरा पोलिसांना कुडे याचा वैद्यकीय अहवाल मिळाला. वैद्यकीय अहवालात किडनी काढण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याने अब पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे. फिर्यादी शेतकऱ्याने चेन्नई येथील एका डॉक्टरने त्याला कंबोडिया येथे जाण्यात मदत केल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. पीडित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार चेन्नई मधील या डॉक्टरने कोलकाता येथे त्याच्या माणसाच्या मदतीने वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर कंबोडिया पर्यंत नेण्यात मदत केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा डॉक्टर या रॅकेटचा भाग आहे का आता या दिशेने तपास होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 05:17:29
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 18, 2025 05:04:27
Amravati, Maharashtra:AMT_FARMER_LOSS चार फाईल आहे अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित ४३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित; शेतकऱ्यांना ई-केवायसी चा फटका अँकर :- अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या तब्बल ४३ हजार २३३ शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे मंजूर असलेली मदत रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेली नाही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे ५५६ कोटी ७३ लाख रुपयांची मदत शासनाकडून मंजूर झाली असून आतापर्यंत ५ लाख ५४ हजार २६५ शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली आहे. मात्र आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहे. ई-केवायसी न झाल्यामुळे निधी वितरणात अडथळे येत असून जिल्हास्तरावर विशेष मोहिम राबवून शेतकऱ्यांनी तातडीने आधार संलग्न बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 18, 2025 04:35:50
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 18, 2025 04:04:14
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 18, 2025 04:03:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 18, 2025 04:03:31
Nagpur, Maharashtra:नागपूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 22 जागाची मागणी केलीय... निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत नागपुरात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाला 15 टक्के जागा मिळाव्या वा 22 जागा महायुती मिळाव्या अशी मागणी लावून धरली आहे.. एकीकडे भाजपाकडून गेल्या वेळेस जेवढी ताकद तेवढ्यात जागा सोडण्याची तयारी असल्याचे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस करता एकच जागा सोडण्याची तयारी दाखवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून 22 जागांच्या मागणीमुळे नागपुरात महायुतीत चर्चेपूर्वीच जागावाटपाचा समीकरण अवघड असल्याचं दिसून येतेय... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कडून अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी असल्याची इशाराही देण्यात आलाय... महायुतीत जागावाटपांचा निर्णय मात्र वरिष्ठ स्तरावर होणार असल्याचेही जैनांनी सांगितले... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी..
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 18, 2025 03:54:36
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळेत बिबट्याची दहशत एकाच रात्रीत बिबट्याने चार गुरांना केलं ठार याापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. ही गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेली असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आलं. मिरजोळे सोनारवाडीतील गुरांवरील या हल्ल्यामुळे संपूर्ण मिरजोळे आणि लगतच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 18, 2025 03:31:31
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 03:22:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची बुधवारी क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठीकाठा, लाठांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घात घालत होती. यात पठाण यांचा मृत्यू झाला. याबाबत रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत. पठाण यांच्या कुटुंब मूळ ओव्हरगावचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांच्या जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठीकाठ्या, रॉडने हल्ला केला. दादा पठाण जागीच मरण पावले.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 18, 2025 03:20:33
Parbhani, Maharashtra:अँकर- महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या असून सध्या युती आघाडीसाठी नेत्यांकडून प्रयत्न चालले आहेत. पण इच्छुक मात्र उमेदवारीसाठी नेत्यांकडे गळ घालून टाकून बसले आहेत. त्यामुळे युती आघाडी नको रे बाबा अशीच काहीशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याची पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडी जर झाली तर तिकीट कटण्याची भीती इच्छुकांना वाटू लागलीय. महायुती आणि महाविकास आघाडीकडे तीन-तीन पक्ष एकत्र आल्याने मोठी भाऊ गर्दी झालीय,मागील आठ वर्षापासून निवडणुका न झाल्याने अनेकजण मनपा निवडणूक लढण्यास तयार झाली आहेत. अनेकांनी आप आपल्या प्रभागात निवडणूक लढण्याची तयारीही सुरू केली आहे. पण जर युती किंवा आघाडी झाल्यास आपलं तिकीट कटण्याची इच्छुकांना भीती वाटू लागलीय...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 18, 2025 03:20:05
Latur, Maharashtra:लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली. AC - लातूर बाजार समितीत सोयाबीनचे खुल्या बाजारातील भाव स्थिर असल्याचा थेट परिणाम दिसून येतोय. अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या सर्वसाधारण दरात कोणतीही वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकडे पाठ फिरवली आहे. बाजार समितीत सोयाबीनची केवळ १२ हजार ३२८ क्विंटल इतकीच आवक झाली आहे. सोयाबीनचा कमाल दर ४ हजार ७२१ रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर ४ हजार ५०० रुपये इतका राहिला. दरम्यान, इतर कडधान्यांचे दर पाहिले तर उडदाला ४ हजार ८००, मूग ६ हजार २५०, हरभरा ५ हजार, तूर ७ हजार तर करडईला ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने येत्या काळात आवकेत वाढ होणार की घटच कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top